
तुरीला हंगामातीलउच्चांकी भाव
- By -
- Aug 21,2023
तुरीला अमरावती बाजार समितीत हंगामापासूनचा उच्चांकी भाव मिळाला (दिनांक 18 ऑगस्ट) आहे. शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी 11387 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.
नवीन तूर बाजारात यायला सहा महिन्यांचा कालावधी आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या अतिपावसाने तुरीच्या उत्पादनात कमी आलेली आहे. देशात सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भाव कडाडले आहेत. अमरावती येथील बाजार समिती एक प्रकारे तुरीचे हब बनली आहे.