
परभणी बाजार समितीत कापूस खरेदी बंद!
- By -
- Jan 31,2024
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कापूस जिनिंग प्रेसिंग संघटना व हमाल-माथाडी कामगार संघटना यांच्यात कापूस हमाली दर वाढीसंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हमाल कामगार काम बंद ठेवणार आहेत. परिणामी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावरील कापूस खरेदी सोमवारपासून (दि. 29) बंद राहणार आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आपला कापूस पुढील सूचनेपर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डावर विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण व सर्व संचालक मंडळ, सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.