
मोदींच्या स्वागताला कांदे की फुले? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये कसं होणार स्वागत?
- By -
- Jan 11,2024
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक जिल्ह्यात येणार आहे. नाशिकला कांद्याची राजधानी म्हटलं जातं. याच मोदी सरकराने एक महिन्यापुर्वी कांद्यावर निर्यातबंदी टाकली. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर पडले. याच पार्श्वभूमीवर सरकारचे प्रमुख असलेले नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार आहे. त्यांचा रोड शो देखील होणार आहे. परंतू यावेळी नाशिकचे शेतकरी मोदींचे स्वागत करताय की निषेध हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.