new-img

पीएम किसानचा १९ वा हप्ता लवकरच जमा होणार

 

पीएम किसानचा १९ वा हप्ता लवकरच जमा होणार

शेतकऱ्यांना खात्यात १९ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी करा ई-केवायसी

पीएम किसान सन्मान निधी योजनेतर्फे शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. आता शेतकरी १९ व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. पीएम मोदी २४ फेब्रुवारीला बिहारमध्ये एक कार्यक्रम करणार आहेत, ज्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ व्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी कशी करावी?

पीएम किसान सन्मान निधीचे अधिकृत अॅप Google Play Store वरून डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करा.

नंतर अॅपमध्ये लॉगिन करा आणि लाभार्थी पर्याय निवडा.

तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.

आधार क्रमांक टाकल्यानंतर स्कॅन फेसिंग पर्याय स्वीकारा.

तुमची ई-केवायसी प्रक्रिया २४ तासांत पूर्ण होईल.


याशिवाय, शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यातील डीबीटी इनेबल हा पर्याय सुरू करणे आवश्यक आहे. तुम्ही ई-केवायसी सीएससी केंद्रावर देखील करू शकता.