प्रतिक्षा संपली! २४ फेब्रुवारीला जमा होणार पीएम किसानचा १९ वा हप्ता
- By - Team Agricola
- Feb 08,2025
०८-०२-२५
प्रतिक्षा संपली! २४ फेब्रुवारीला जमा होणार पीएम किसानचा १९ वा हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात २४ तारखेला हप्ता वितरीत केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये २००० रुपयांच्या प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यावर असणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलीय.