new-img

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कार्ड कोणाला मिळू शकते?

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कार्ड कोणाला मिळू शकते?

किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली योजना आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने ही योजना १९९८ मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जाते. या योजनेत परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे लागते. मात्र योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही. आता सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज पाच वर्षांपर्यंत घेता येते. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षांपर्यंत आहे.