new-img

पशूपालक शेतकऱ्यांना सरकार करणार मदत

पशूपालक शेतकऱ्यांना सरकार करणार मदत

केंद्र सरकारने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. या कार्डच्या माध्यमातून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय करण्यास मदत मिळणार आहे.  कार्डच्या मदतीने पशुपालनासोबतच मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते. यापूर्वी या कार्डवर ३ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होते, मात्र ते आता ५ लाख रुपये करण्यात आले आहे.
जर तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज मागवावा लागेल. हा फॉर्म भरण्यासोबतच तुम्हाला काही KYC कागदपत्रे जमा करावी लागतील. बँक कर्मचारी तुम्हाला कागदपत्रांची माहिती देतील पशुपालन करणारे शेतकरी या कार्डद्वारे ५ लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतात. या कार्डच्या मदतीने म्हशीसाठी ६०,२४९ रुपये तर प्रती गाय ४०,७८३ रुपये, प्रति कोंबडी ७२० रुपये आणि मेंढी किंवा शेळीसाठी ४०६३ रुपये कर्ज उपलब्ध आहे. या कार्डवर १.६ लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही.