new-img

अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना फायदा होणार

अर्थसंकल्पात पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना फायदा होणार


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामधील महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान धन धान्य कृषी योजना आहे. राज्यांच्या सहकार्यानं पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या योजनेत १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या योजनेचा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.