अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना माेठी भेट, किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांवर
- By - Team Agricola
- Feb 01,2025
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना माेठी भेट, किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांवर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थसंकल्प देशातील गरीब, शेतकरी आणि महिलांना समर्पित आहे असे सुरुवातीलाच त्यांनी जाहीर केले होते.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे.