सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
- By - Team Agricola
- Feb 01,2025
सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्यामुळे, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पुढील ६ दिवस आपले सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावर देता येणार आहे.