
फलटण बाजार समिती कोल्हापूर विभागात अव्वल
- By -
- Nov 06,2023
महाराष्ट्र शासन पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत केलेल्या पाहणीत कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणने संपूर्ण महाराष्ट्रातून 19 वा आणि कोल्हापूर विभाग व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट रँकिंग लिस्ट तयार करताना बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा व इतर सेवा सवलती, आर्थिक व वैधानिक कामकाज यासह अन्य कामकाजविषयक निकष विचारात घेऊन सहकार व पणन विभागाकडून स्वतंत्ररीत्या ऑनलाइन मूल्यांकन करून राज्य व विभागस्तरीय रॅकिंग लिस्ट जाहीर करण्यात आली. यात फलटण बाजार समितीने आपले कामकाज व शेतकरी सेवेतील अव्वल स्थान सिद्ध केले आहे.