new-img

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी फार्मर आयडी आवश्यक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी फार्मर आयडी आवश्यक

केंद्र व राज्य सरकारकडून शेती विषयक योजना चालवल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे.  महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीस्टॅक अंतर्गत डिजीटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे.  शेतकऱ्यांना जर पीएम किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास फार्मर आयडी मिळवावा लागेल.  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये ६००० रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यामुळं आगामी १९ व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळवणं आवश्यक आहे. हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड, सात बारा उतारा गट क्रमांक, नमुना 8 अ खाते  उतारा क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणं आवश्यक आहे. फार्मर आयडी नोंदणीसंदर्भात तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक आणि सीएससी केंद्र चालकांशी संपर्क करु शकता.