new-img

सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

सोयाबिन  खरेदीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशांमध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने  केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. 
यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला अडचण येऊ नये यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला त्यांनी दिल्या. ३१ जानेवारी ही खरेदीची अंतिम मुदत आहे. त्यासाठी केवळ २ दिवस शिल्लक राहिले असल्याने ही मुदत वाढवावी अशी विनंती केली जात आहे.