कांद्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपाययोजना
- By - Team Agricola
- Jan 30,2025
कांद्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपाययोजना
१. कांद्याला लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि ५० किलो पालाश द्यावे.
२. कांद्याला नियमित पाणी द्यावे, पाणी देतांना वाफ्यात किंवा सरीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
३. पाण्याचा जास्त ताण बसल्यास कांदा पोसत नाही.
४. पाण्याची कमतरता असेल तर भरघोस उत्पादनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
५. कांद्याच्या बल्बचा आकार वाढवण्यासाठी नायट्रोजनचा पुरवठा करावा.