new-img

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता मिळणार !

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता मिळणार !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता मिळणार !

शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता ई-केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या २.७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात २४ तारखेला हप्ता वितरीत केला जाणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांची रक्कम पोहोचणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच ही माहिती दिली.