
प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ
- By -
- Nov 01,2023
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस असल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.