new-img

शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी कशी करावी?

शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी कशी करावी?

https://youtube.com/shorts/bMT7EjhzGvM

शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी नोंदणी आवश्यक आहे हे तर तुम्हाला सांगितल आहे पण कशी करावी ते ही सांगते. कोणताही शेतकरी upfr.agristack.gov.in पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि ज्यावर ओटीपी येतो तो मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲप (फार्मर रजिस्ट्री UP) आणि वेब पोर्टल upfr.agristack.gov.in द्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. तसेच शेतकरी कोणत्याही सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) ला भेट देऊन शेतकरी नोंदणी करू शकतात, यासाठी आधार ओटीपी मिळविण्यासाठी त्यांच्याकडे आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. शेतकरी नोंदणीची अंतिम तारीख ही ३१ जानेवारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ जानेवारीच्या आत शेतकरी नोंदणी आवश्यक आहे.