अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ, कृषी मंत्र्यांचा मोठा निर्णय!
- By - Team Agricola
- Jan 20,2025
अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ, कृषी मंत्र्यांचा मोठा निर्णय!
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी १८ जानेवारी रोजी मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरु असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.