new-img

गहू पिकाला असे पाणी देणार तर नफाच नफा

गहू पिकाला असे पाणी देणार तर नफाच नफा

https://youtube.com/shorts/TbzSdGYuWUI

तुम्ही तुमच्या शेतात गहू लावला असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. इतर रबी पिकांच्या तुलनेत गहू पिकाला पाणी जास्त लागते. गहू पिकाला पाणी देण्याची पद्धत आणि त्याचे नियोजन कसे करावे ते सांगते. मध्यम ते भारी जमिनीत गहू पिकाला ४ ते ५ वेळा पाणी द्यावे. दाण्यांचा विकास होत असताना बाष्पीभवन वेगाने होत असल्यास पाणी द्यावे. ओलावा कमी पडल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अतिरिक्त पाणी देणे टाळावे. पाणी दिले तर पीक लोळण्याची व बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ४० ते ५० टक्के बचत होते. गहू पिकाला पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार करावा.