
संचालक मंडळाला जे अधिकार ते प्रशासकाला नाही
- By -
- Oct 11,2023
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी, 'निवडून आलेल्या संचालक मंडळाला जो अधिकार असतो, तो नियुक्त प्रशासक मंडळ वा प्रशासकाला नसतो. सरकार नियुक्त प्रशासकीय मंडळाला तर बिलकूल नसतो' असे स्पष्ट मत व्यक्त केले.