
विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू
- By -
- Oct 10,2023
मागील आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. असे असताना आजपासून (दि. 28 सप्टेंबर) विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू झाले आहे. कांद्याला कमीत कमी 1000 तर जास्तीत जास्त 2401 तर सरासरी 2101 रुपये भाव मिळाला. आठ दिवसांच्या बंद नंतर कांदा लिलाव सुरळीत झाल्याने विंचूर उपबाजार आवारात रौनक पहायला मिळाली.