
बंतोष अँप मुले मंचर बाजार समिती बनली आहे हायटेक
- By -
- Oct 03,2023
मंचर बाजार समिती ही राज्यातील एक प्रगत बाजार समिती म्हणून ओळखली जाते. प्रामुख्याने बाजार समितीमध्ये बंतोष अॅपच्या मदतीने ऑनलाईन प्रक्रिया पार पडत आहेत. शेतकरी, आडतदार, मापाडी सर्वांनाच यातून फायदा होत असून बाजार समितीच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. 'रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम'मुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला किती बाजारभाव मिळाला, काटा पावती, सौदापावती मिळते.